Apshinge Village, Koregaon Taluka, Maharashtra, India - 123456
+91 9876543210
सरकारी योजना

रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम

राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग ...

Zilla Parishad
October 12, 2025
रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम

योजनेचा आढावा

राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती योजनेत्तर (लेखाशिर्ष क्र.3054-2419) हा कार्यक्रम सन 2012-13 आर्थिक वर्षापासून ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येतो. रस्ते विकास आराखडा 2001-21 नुसार राज्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची एकूण लांबी 2,36,000 कि.मी. इतकी आहे. ग्राम विकास विभागाच्या दि.10 सप्टेंबर, 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमांतर्गत रस्त्यांच्या कामांची गट-अ, ब, क, व ड अशा चार गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. गट-अ/ड मध्ये किरकोळ दुरुस्ती (उदा. खड्डे भरणे, बाजूपट्ट्या तासणे, उखडलेले कठडे/पॅरापेट दुरुस्ती) स्वरुपाची कामे व गट-ब/क मध्ये विशेष दुरुस्ती व पूलांच्या दुरुस्तींची कामे (उदा. रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण, सुधारणा, पुल/मोऱ्यांची दुरुस्ती) हाती घेतली जातात.

फायदे

ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्याने व्यापार, शेती, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक प्रगतीस चालना मिळत आहे

पात्रता निकष

Maintenance and repair of Rural Roads and Other District Roads and the bridges over them

अर्ज प्रक्रिया

जिल्हा परिषद स्तरावर

द्रुत क्रिया

विभागाशी संपर्क साधा

आवश्यक कागदपत्रे

GR/Circular/Guidelines: 10th September, 2012.

संपर्क माहिती

विभाग:
Zilla Parishad

अधिक माहितीसाठी:
कार्यालय भेट द्या

या योजनेबद्दल मदत हवी आहे?

वैयक्तिक मदत आणि मार्गदर्शनासाठी आमच्या कार्यालयात भेट द्या